मराठी असल्याची जाणीव होण्यासाठी महाराष्ट्र सोडावा लागतो ... हा साक्षात्कार मला अमेरिकेत झाला. वयाची २२ वर्षे महाराष्ट्रात आणि विशेष करून पुण्यात काढली. इंजिनियरिंग कौलेजत प्राध्यापकांची आडनावे देव, नार्खेडे, धान्डे, हळबे अशी असल्याने माझ्यासाठी इंग्रजी म्हणजे परीक्षेतल्या पेपरावर ओकण्याची भाषा होती. मित्रमंडळात गानू, शेंडे, वाटवे, पुण्यात आयुष्य गेलेला व १ २ ३ मराठीत मोजणारा बंगाली कम मराठी "सेन" असे मित्र.
मुळात माझे शिक्षण मराठी माध्यमातले. त्यमुळे इंग्रजी माध्यमाच्या मुलांसारखे ही ही ही हा हा हा यु नो असले कधी जमलेच नाही. नीट नेटके राहणार्या या श्रीमंत इंग्रजी माध्यमाच्या मुलांकडे पाहून माझ्या मनात एक प्रकारचा न्यूनगंड निर्माण झाला होता. पण अमेरिकेत आल्यापासून या नाटकि तर्हा शिकून घेतल्या आहेत. सकाळी तोंडावर हसू आणि गुड मॉर्निंग याची आता चांगलीच सवय झाली आहे. ३ ते ४ वर्षापूर्वी सकाळी कोणी चुकुन गुड मॉर्निंग म्हणाले तर "हाड तिच्या मायला" असे सर्वांगसुंदर उत्तर आमच्या श्रिमुखातून निघत असे.
आता बे एरिया येथे एका तेलगु मुलाबरोबर नोकरी निमित्त वास्तव्य आहे. त्याचे बरेच मित्र रूम वर येत असतात. त्यांच्या बरोबर चित्रपट पहाणे, फिरणे असे दिनक्रम चालू असतात. हे तेलगु लोक इथे एकत्र रहातात. किंबहुना मराठी लोकांपेक्षा जास्त एकत्र दिसतात. एक दिवस माझा तेलगु मित्र प्रकाश मला म्हणाला, " आज बोले तो मेरा हैदराबादी दोस्त घरपे आ रा, फिल्म देखेंगे, डिनर बाहर करते, तुम खुश होणा उससे मिल्के, वो महाराष्ट्रीयन होणा, उसका सरनेम अप्सिन्घेकर होणा " मलाही थोडी उत्सुकता लागली. कोण हा मराठी आणि या हैदराबादी ला का भेटायला येतोय.
तो आला. आणि त्याने अनाकलनीय अशा तेलगु भाषेत बोलायला सुरवात केली. प्रकाश ने आमची ओळख करून दिली. मीच त्याला नाव गाव काम वैगेरे इंग्रजीतून विचारले. नंतर हळूच विचारल "मराठी येता का ? " तो म्हणाला "हो तर, आम्ही घरी मराठीच बोलतो. माझ्या लहानपणीच बाबा हैदराबाद ला शिफ्ट झाले. त्यामुळे घरी मराठी आणि बाहेर तेलगु ". त्याच्या तोंडून मराठी ऐकून मला थोडा बर वाटल. नंतर चित्रपटाला जाण्यासाठी आम्ही कार मध्ये जाऊन बसलो. प्रकाश गाडी चालवत होता. मी त्याच्या शेजारी आणि मागे अप्सिन्घेकर. १५ - २० मिनिटे गेली. आणि प्रकाश एकदम म्हणाला" तुम लोगा अपनी भाषा मे बोलो" आणि माझ्याकडे पाहून म्हणाला "तुम नॉर्थ इंडियन लोगा बहूत शरमाते" आणि ताबडतोब माझ्या तोंडातून निघून गेले " Prakash.... for you, I am north indian...but for me, north india is different"
त्याच क्षणी मला माझ्या अस्तित्वाची, मराठीपणाची जाणीव झाली. अस वाटल, मलाही भाषिक अस्तित्व आहे.
मी मराठी म्हणजे काही विशेष भाषिक वारसा घेऊन आलो आहे. आणि त्याच वेळि थोडा अभिमान ही वाटला ...
मराठी होण्याचा.... त्या वेळि हे असा का वाटल हे मलाही नाही समजल.... पण ती जाणीव फार हृदय स्पर्शी झाली.
त्यानंतर आम्ही चित्रपट गृहात पोहोचलो. त्या दोघां नि तेलगु चित्रपटाचे तिकीट काढले.
मी त्यांच्या बरोबर आहे याची जास्त पर्वा केली नाही. मीही हिंदी चित्रपटाचे वेगळे तिकीट काढले. आणि हिंदी सिनेमालाजाऊन बसलो.
रात्री जेवण बाहेरच घेतल. जेवताना पूर्ण वेळ दोघांची बड्बड चालली होती अर्थात त्यांच्या भाषेत.
प्रकाशाचा मित्र मराठी असून तेलगु संस्कृतीत किती मुरला आहे ते दिसल. जेवताना माझ्याशी तो तसा कमीच बोलला.
त्याने पुण्यातील नाटकांबद्दल विशेष कुतुहुल दाखविले. "आजूनही पुण्यात नाटके चालतात का ?" असे विचारले. त्याने सांगितले " माझ्या काका न्नी शांतेचा कार्ट चालू आहे या नाटकात छोटि भूमिका केली होती. " मला साहजिकच आश्चर्य वाटल.
म्हणजे आजुन ही तो मराठीशी जवळीक साधून होता. पणत्याच्या तेलगु संस्कृतीत पूर्ण रमलेला.
नंतर घरी जाताना मी गाडीत विचार करू लागलो. हा महाराष्ट्रीयन असून दुसर्या प्रांतात , दुसर्या भाषेत रमला.
तसेच बाहेरचे लोक महाराष्ट्रात येतात आणि आपला प्रांत समजून रहातात. बंगाली, गुजराती, कानडी, मारवाडी आपल्या राज्यात येतात
आणि आपली मराठी शिकतात व बोलतात. शुद्ध मराठी नाही आले तरी त्यांच्या भाषेच्या ढन्गात बोलतात. पण प्रयत्न करतात.
त्यांच्या बोलण्यातली कानडी, मारवाडी किंवा सिंधीआपल्याला जाणवते. पण तुम्ही निरीक्षण केले आहे का ??
मराठी भाषेला बिहारी ढन्ग कधी पाहण्यात नाही आला. याचा अर्थ बिहारी लोक महाराष्ट्राला आपला प्रांत मनात नाहीत. मी राज ठाकरे समर्थक नाही आहे
पण त्यांच्या बोलण्यात काही तरी सत्य आहे. .....नाही का ????????????????
2 comments:
nicely written dude!
Keep it up.
I shall mail you detailed comments.
Aapan marathi lok nahi bolat patkan ekamekanshi....sarvajanik thikani marathit bolanyachi kay laj vatate mahit nahi...chan mandalet mudde tumhi...
yach aashayachi majhi post ithe vacha..
www.sahajach.wordpress.com
Tanvi
Post a Comment